आमच्या चिंचखरे ब्लॉक्सच्या "फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लब" चे आपण अध्यक्ष व्हा असं सांगायला जेव्हा काही तरूण मंडळी आली तेव्हा मला धक्काच बसला. चिंचखरे ब्लॉक्समधे आम्ही रहायला येऊन आता बरेच दिवस झाले होते. ही अध्यक्षपदाची विनंती करायला आलेली तरुण मंडळी हां हां म्हणता तरूण झाली होती . विशेषताः गुप्तेकाकांची निमा तर भलतीच स्मार्ट दिसत होती .“काय वडील ठीक आहेत ?" मी आपलं उगीचच हा इसम आपल्याकडे पहात