..चव्वेचाळीस – पंचेचाळीस सालची गोष्ट असेल. पुण्यातल्या भावे स्कूलच्या हॉलमध्ये कुमारचे गाणे झाले होते. त्या दिवशीची ‘ सुघर बर पायो ‘ अप्रतिम जमली होती. त्याच मैफिलीत कुमारने " प्रेम केले काय हा झाला गुन्हा" हे राजा बढ्यांचे भावगीत म्हंटले होते. मैफिलीला भानुमती श्रोत्यांत होती. " प्रेम केले काय हा झाला गुन्हा" ही ओळ म्हटल्यावर श्रोत्यांत एक " आम्ही वळखलं गss" च्या चालीची खसखसही पिकली होती. त्या