जून, २०००. मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाला होता. माझी पेरणी, झाडं लावणं चाललेलं होतं. १२ जूनला पु. ल. देशपांडे गेल्याची बातमी कळली. मी पेरणीची कामं थांबवली आणि त्या रात्रीच पुण्याला निघालो. दुसऱ्या दिवशी पुण्यात भाईंचं अंत्यदर्शन घेतलं. तिथे दिवसभर माणसांची प्रचंड गर्दी होती, पण सारं कसं शांत, नि:शब्द!त्यानंतर तीन महिन्यांनी मी आणि माझी पत्नी पुन्हा सुनीताबाईंना भेटायला गेलो. आम्ही तिघांनीच दीड तास