आदर्श टुमदार सुंदर खेड्याबद्दल माझ्या काही अपेक्षा असतात. त्या खेड्याच्या उशाशी टेकडी असावी. त्या गावाच्या गळ्यात जाता जाता लडिवाळपणे हात टाकून गेलेली नदी असावी. घाटदार कळसाचे देऊळ असावे. गावाच्या पाठीशी पहाऱ्याला रमे असलेले उंच आकाश-निंब असावेत. पिंपळाचा पार असावा. त्या पारावर घडलेली कहाणी असावी. गावाकडून वाट मुरडत मुरडत यावी आणि एखाद्या अगदी चिमुकल्या स्टेशनाला मिळावी. स्टेशन इतके चिमुकले हवे