एक चाळीशी.. हवीहवीशी – (प्रेरणा कुलकर्णी)

गेल्या आठवड्यात पुलं चा स्मृतिदिन होता त्यानिमित्त हा लेख. कितीतरी महिने हे डोक्यात घोळत होतं. आज त्याला शब्दरूप देता आलं. पुलं च्या स्मृतीस त्रिवार वंदन!गेल्या दोन तीन वर्षांपासून मला एका गोष्टीचं अत्यंत कुतूहल वाटतंयं. काळा जाड्या फ्रेमचा चष्मा आणि अर्थात त्यामागील ते मिश्किल, प्रेमळ, आणि हसरे डोळे.. म्हणजे इतकं की तुम्हाला काय व्हायला आवडेल असा … Read more

स्वरयात्री पु. ल. – (अमृता देशपांडे)

‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे हे जग सोडून गेले, त्याला आज २४ वर्षं पूर्ण होत आहेत. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेल्या पुलंचं ‘संगीतकार’ हे रूपही अतिशय सुरेल होतं. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी व पुलंच्या संगीतप्रेमाविषयी…१२ जून २००० या दिवशी पुलंचं देहावसान झालं. त्या दिवशी पु. ल. देशपांडे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता, तर अवघ्या … Read more

पु. ल. आज तुम्ही हवे होतात. – (अविनाश चंदने)

पु. ल. देशपांडे यांचा जन्म हा देण्यासाठीच झाला होता. त्यांनी महाराष्ट्राला उत्तम साहित्य दिले, उत्तम संगीत दिले, सुंदर काव्य दिले, मराठीजनांना पोट धरून हसवले, सामाजिक संस्थांना न बोलता ओंजळी भरून दिले. गुणीजनांचे तोंडभरून कौतुक करण्याची ख्याती पुलंचीच! साहित्य, नाटक, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संगीत मैफल या सर्वांवर त्यांची हुकूमत होती. पुलंनी प्रत्येक गोष्टीला चार चाँद लावले. … Read more

शाहूमहाराज – आकाशाएवढा मोठा राजा

…..’संस्थानिक’ ह्या कल्पनेला चांगल्या अर्थाने तडा देणारी जर कुणा एका संस्थानिकाची कथा माझ्या कानावर माझ्या लहानपणी पडली असेल तर ती कोल्हापूरच्या शाहूमहाराजांची. त्याला कारण होते. माझे आजोबा कोल्हापूर संस्थानात भाग-कारकून नावाच्या महिना तीनचार रुपयांचे वेतन मिळवायच्या हुद्द्यावर होते. ‘करवीर दरबारातली नोकरी’ असा ह्या नोकरीचा प्रौढ भाषेतला उल्लेख असायचा. माझ्या वडिलांचा जन्म आणि शिक्षण

हशा-टाळ्या पलीकडचे पु.ल. – (विनायक होगाडे)

पुलंची वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका काय होती? याबाबतची चर्चा फारशी होताना दिसत नाही. ‘हशा-टाळ्या पलीकडचे पुलं’ समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला आहे का, या प्रश्नावर त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.ज्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार महाराष्ट्राला फारसा माहीत नव्हता, त्या काळात पु. ल. देशपांडे हे या प्रकारातले ग्रेट एंटरटेनर होते. मात्र, त्यांची … Read more

तुमने हमको हसना सिखाया.. – (निमिष वा.पाटगांवकर)

"…..इंग्लडला जायला कोणती इंजेक्शने घ्यावी लागतात ह्या प्रश्नाला फक्त दमा, रक्तक्षय आणि बाळंतरोग याखेरीज बहुतेक सगळ्या रोगांची नावे मला सांगितली गेली.. ज्याला जे सुचेल ते तो सुचवत होता. पिवळ्या तापावर फारच दुमत होते. पिवळा ताप फक्त अमेरिकेला जायला अडवतो हे त्यांचे म्हणणे".. "अपूर्वाई"तल्या या प्रसंगाला मी नुकताच जेव्हा सामोरा गेलो तेव्हा लक्षात आले कि पु.ल. … Read more

फलाट

आदर्श टुमदार सुंदर खेड्याबद्दल माझ्या काही अपेक्षा असतात. त्या खेड्याच्या उशाशी टेकडी असावी. त्या गावाच्या गळ्यात जाता जाता लडिवाळपणे हात टाकून गेलेली नदी असावी. घाटदार कळसाचे देऊळ असावे. गावाच्या पाठीशी पहाऱ्याला रमे असलेले उंच आकाश-निंब असावेत. पिंपळाचा पार असावा. त्या पारावर घडलेली कहाणी असावी. गावाकडून वाट मुरडत मुरडत यावी आणि एखाद्या अगदी चिमुकल्या स्टेशनाला मिळावी. … Read more

चाळीची साठी – (सुनील शिरवाडकर)

१६ फेब्रुवारी १९६१.स्थळ..भारतीय विद्या भवन,मुंबई.’इंडियन नैशनल थिएटर'(आय एन टी) चा महोत्सव. रिकाम्या रंगमंचावर फक्त एक कलाकार.. त्याचा एक मफलर.. आणि एक बाकडं.बस्स एवढ्या सामग्रीवर अडिच तीन तास लोकांना खिळवुन टाकलं त्या कलाकारानी. तो कार्यक्रम होता..’बटाट्याची चाळ’.आणि तो सादर केला पु.ल.देशपांडे यांनी. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); ‘बटाट्याची चाळ’ चा हा पहिला प्रयोग.

गांधीयुग व गांधीयुगांत

परतंत्र भारतातील जनतेमध्ये भय, दारिद्र्य, आलस्य, अविश्वास इत्यादि जे दोष निमाण झाले होते, ते नष्ट करण्यासाठी गांधीजींनी जनतेच्या हाती अहिंसक प्रतिकाराची समर्थ आयुधे कशी दिली, याची मीमांसा पुढील लेखात केली आहे. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यकाळात गांधीय मूल्यांचा लोप भारतामध्ये झालेला कोठे कोठे दिसतो, हेही त्यात विवेचिले आहे.गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “ गांधीवाद नावाची कोणत्याही प्रकारची

लंडनचा नाताळ

परिचयः पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (जन्म १९१९)- ह्यांना विनोदी लेखक व प्रतिभाशाली नाटककार म्हणून फार मोठी मान्यता मिळाली आहे. प्रारंभी काही दिवस मराठीचे प्राध्यापक, नंतर मुंबई व दिल्ली येथील आकाशवाणी केंद्रात अधिकारी होते. त्यांचे ‘खोगीरभरती’, ‘नस्ती उठाठेव’ इत्यादी विनोदी लेखसंग्रहः ‘अंमलदार’, ‘तुझे आहे तुजपाशी’ इत्यादी नाटके फार प्रसिद्ध आहेत. ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’ इत्यादी एकपात्री